महाराष्ट्र राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघातील,दोन राष्ट्रवादी पक्षांमधील नणंद विरुद्ध भावजय लक्षवेधी लढत,अत्यंत चुरशीची होणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लक्षवेधी ठरत असलेल्या बारामती मधील,दोन राष्ट्रवादी पक्षांमधील नणंद विरुद्ध भावजय लढत,अत्यंत चुरशीच्या वळणावर पोहोचली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने,बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर करताच, थोड्याच अवधीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदार संघातील लढत ही आता दोन राष्ट्रवादी पक्षांमधील उमेदवार असलेल्या नणंद विरुद्ध भावजय यांच्यात होणार आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत बारामती मधून सुप्रिया सुळे,शिरूर मधून डॉ.अमोल कोल्हे,अहमदनगर मधून निलेश लंके,वर्धा मतदार संघातून अमर काळे,दिंडोरी मतदार संघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून,याची घोषणा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात, पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.त्याबरोबरच पुढील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत,बारामती मधून सुनेत्रा पवार व परभणी मधून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली असून,आज याबाबत अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे. 

एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील, दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ननंद विरुद्ध भावजय होणाऱ्या लढतीकडे, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असेल हे मात्र निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top