शारीरिक आरोग्यातील हाडांच्या बळकटीसाठी,भरपूर कॅल्शियम असलेल्या पदार्थांविषयी माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 43.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

जास्तीत जास्त लोक हाडांच्या आरोग्याकडे कमी लक्ष देतात.हाडं आपल्या शरीराचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.म्हणून हाडांची काळजी घेणं फार गरजेचं आहे.(Non Dairy Foods For Calcium) आजकाल वयाच्या तिशीत किंवा चाळिशीआधीच लोकाना कॅल्शियम आणि व्हिटामीन डी कमी झाल्यामुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे ऐन तारूण्यातच ऑस्टिओपोरोसिस,सांधेदुधी,बोन फॅक्चर या समस्या उद्भवतात.

कॅल्शियमने परिपूर्ण अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल.आहारतज्ज्ञ डॉक्टर रोहित यादव यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना काही पदार्थांबद्दल सांगितले आहे ज्याच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल.

मानवी शरीराला किती कॅल्शियमची आवश्यकता असते...?

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार 6 महिन्यांच्या मुलांना २०० मिली ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.७ ते १२ वर्ष वयोगटात २६० मिली ग्रॅम कॅल्शियमची गरज असते.४ ते ८ वर्ष वयोगटात १००० मिली ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.नॉन डेअरी कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास किडनी स्टोनची जोखिम कमी होते.

१) खसखस...

कॅल्शियम मिळवण्यासाठी तुम्ही दही दुधाव्यतिरिक्त खसखसचा आपल्या आहारात समावेश करू शकता. खसखस आयर्न,कॅल्शियम आणि गुड फॅटचा चांगला स्त्रोत आहे. कॅल्शियमयुक्त खसखसचे सेवन केल्यानं हाडांच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.खसखस गरम असल्यामुळे याचे सेवन तुम्ही मर्यादित प्रमाणात करायला हवे.

२) चिया सिड्स...

जर तुम्हाला मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थ यापैकी काहीच आवडत नसेल तर तुम्ही चिया सिड्सचा आहारात समावेश करू शकता.चिया सिड्सच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतील.चिया सिड्समध्ये कॅल्शियम, ओमेगा3 फॅटी एसिड्स आणि प्रोटीन्स असतात.चिया सिड्सच्या प्रत्येक सर्विंगमध्ये जवळपास 400 ते 600 मिलीग्रॅम कॅल्शियम असते.

३) हिरव्या पालेभाज्या...

हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने शरीराला भरपूर पोषण मिळते.यात व्हिटामीन ए,सी,के,आयर्न,फायबर्स आणि कॅल्शियमही असते.तुम्ही पालक,केल या भाज्यांचे सेवन करू शकता.ज्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही.कॅल्शियम,आयर्नबरोबरच व्हिटामीन ए आणि व्हिटामीन सी सुद्धा मिळते. 

४) नट्स आणि सिड्स...

काही नट्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.यासाठी बदाम,तिळ,आळशीच्या बीयांचे सेवन करा. हे खाल्ल्याने कॅल्शियमत एंटीऑक्सिडेंट्स,व्हिटामीन के यांसारखे मिनरल्स,फायबर्स,ओमेगा 3 फॅटी एसिड्स मिळतील.एंटी ऑक्सडेंट्सपासून फ्रि रॅडिकल्सचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

५) सोया मिल्क...

१ कप फोर्टिफाईड सोया मिल्कमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.सोया मिल्कमध्ये व्हिटामीन डी चे प्रमाणही जास्त असते.रोजच्या आहारात सोया मिल्कचा समावेश करून तुम्ही समस्या टाळू शकता.यातून प्रोटीन्स आणि व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात मिळतात.

ह्या लेखाचे शब्दांकन डॉ.सुनील इनामदार यांचे असून,श्री. संतोष सावंत सर आरोग्य आणि सोशल समर्थ फाउंडेशन यांचेकडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top