पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे द जर्नलिस्ट एसोसिएशन पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व न्यूज K9 महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉ.रामदास कुंडलिक ताटे यांना डॉक्टररेट पदवी मिळाल्याबद्दल सत्कार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

द जर्नलिस्ट एसोसिएशन,पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष न्यूज K9 महाराष्ट्र,चे मुख्य संपादक डॉ.रामदास कुंडलिक ताटे यांना नुकतीचऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.डॉ.रामदास ताटे यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.डॉ.रामदास ताटे अतिशय मनमिळावू व सामाजिक वंदनीय व्यक्तिमत्व होय.

 द जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्रभर संघटन करण्यात त्यांचा फार मोठा बहुमौलिक वाटा आहे.डॉ.रामदास ताटे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत हृदयस्पर्शी आहे.द जर्नलिस्ट एसोसिएशन,पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने,डॉ. रामदास ताटे,यांना फुलगुच्छ व श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान यावेळी, संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष,वास्तव चक्र न्यूज चे मुख्य संपादक दीपक श्रीवास्तव,संघाचे उपाध्यक्ष,विशेष तपास चे मुख्य संपादक राजू इंगळे,संघाचे कार्याध्यक्ष,दिव्य महाराष्ट्र 24 न्यूज चे मुख्य संपादक किशोर सूर्यवंशी,संघाचे सदस्य सामान्य जनतेचा आवाज चे मुख्य संपादक मिलिंद घाटे,तसेच दिव्य महाराष्ट्र 24 न्यूज,चे प्रतिनिधी राहुल आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top