देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या एकूण 102 जांगेसाठी व महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या 5 जागेंसाठी मतदान शांततेत पार; देशात जवळपास 60 टक्के मतदान झाल्याची नोंद.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त-सोशल मीडिया.

देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या एकूण 102 जागांसाठी व महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या 5 जागांसाठी मतदान शांततेत पार पडले असून,जवळपास देशात 60.03 टक्के मतदान झाले असल्याची नोंद झाली आहे. 

देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या 102 जागांसाठी होऊ घातलेले मतदान हे जवळपास 21 राज्यांमध्ये होते.देशातील पश्चिम बंगाल,छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काही किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता, देशातील सर्वत्र मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.

महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निवडणूक लढवीत असून,त्यांचे बरोबरच जितेंद्रसिंह, किरेन रिजीजू,अर्जुन मेघवाल,काँग्रेस नेते गौरव गोगई, कीर्ती चिदंबरम,द्रमुखच्या नेत्या के.कनीमोळी,ए राजा आदी उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.देशात जवळपास 102 लोकसभेच्या मतदार संघात जवळपास 60.03 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले असून,महाराष्ट्र राज्य 5 लोकसभा मतदारसंघात 55.29 मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकंदरीत देशातील व महाराष्ट्र राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top