सातारा लोकसभा मतदारसंघातून,भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज, पारंपारिक बैलगाडीतुन जनसागराच्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आदी नेत्यांची उपस्थिती होती.

 आज साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या अर्ज भरण्याच्या रॅलीला गांधी मैदान येथून सुरुवात होऊन,शेवटी पोलीस मुख्यालयाच्या पोवई नाक्यापर्यंत जाऊन तेथे,छत्रपती शिवाजी महाराज,माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येऊन,शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात उदयनराजे भोसले यांचे बरोबर मुख्यमंत्री महोदय,दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदय व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला‌.सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला.आज सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे अर्ज दाखल करतेवेळी पारंपारिक बैलगाडीतून जनसागराच्या शक्ती प्रदर्शनाने रॅली जाताना,ही रॅली संपूर्ण सातारा शहरवासीय यांचे लक्ष वेधून घेत होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top