हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ,अमृतनगर ता.पन्हाळा येथे आमदार डॉ.विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनात्मक बैठक संपन्न.!--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ,अमृतनगर (ता.पन्हाळा) येथे शिराळा-वाळवा तालुक्यातील वारणा समुहातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत आमदार डॉ.विनय कोरे (सावकार) यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.

 देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांत प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली असुन,त्यांना पुन्हा बहुमताने पंतप्रधान करण्यामध्ये आपण देखील खारीचा वाटा उचलायचा आहे.म्हणुन हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.धैर्यशील माने यांना,आपल्या शिराळा-वाळवा तालुक्यातून भरघोस मताधिक्यासह निवडून द्यायचे आहे.त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकार) यांनी केले.आमदार डॉ.विनय कोरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी,सर्वच पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी घरोघरी मतदारांचेपर्यंत जाऊन प्रचार करावा असे आवाहन केले.

यावेळी वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहातील सर्व संचालक तसेच शिराळा-वाळवा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top