हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मला संधी दिल्यास,त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून,विश्वासाला सार्थ ठरीन !-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा).

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांनी मला संधी दिल्यास,त्यांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करून, त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरीन असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांनी केले आहे.

 हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांना,पूर्वीच्या खासदारांचा काय अनुभव आहे.? हे मला माहीत नसून,जर हातकणंगले मतदारसंघातील मतदारांनी मला विजयी करून संधी दिल्यास,त्यांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करून, माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थक करीन असे आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित तांबे यांनी,वाळवा प्रचार दौऱ्यात व्यक्त केले.यापूर्वी मी 5 वर्षे जिल्हा परिषद सदस्य व 10 वर्षे आमदार म्हणून काम केले असून,माझे वडील देखील 10 वर्षे आमदार होते. 

मी शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती असून,गेली 40 वर्षे लोकांच्या जनसंपर्कातून कामे करून,प्रेम व आशीर्वाद मिळवले आहेत.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासाला जागून,विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील( आबा) यांनी केले आहे.आम्ही पूर्वीच्या खासदारांना जीवाचे रान करून विजयी केले असून,त्यांचा आम्हाला आलेला पूर्वीचा खासदारकीचा अनुभव चांगला नसून,आमच्यापेक्षा वेगळा अनुभव तुम्हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा असणार नाही असेही त्यांनी आज वाळवा तालुक्यातील प्रचार दौऱ्या दरम्यान मत प्रदर्शित केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top