गुजरात राज्यामधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड; पहिला निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त:-सोशल मीडिया.

गुजरात राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली असून,भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजयाचे पहिले खाते उघडून पहिला मान मिळाला आहे.देशातील लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल दि 4 जून 2024 लागणार असून,आज भारतीय जनता पार्टीच्या सुरतमधील उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड होऊन, खासदारपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळी सर्वच्या सर्व म्हणजे आठही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने,सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे,तसेच याबाबतीत लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान यापूर्वीच सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभारे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने व बीएसपी चे उमेदवार प्यारेलाल भारती यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने,सुरत लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग सुकर झाला. 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून मुकेश दलाल यांची ओळख असून, देशातील लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येणारे म्हणून पहिलेच खासदार ठरले असल्याचा मान भारतीय जनता पार्टीचे मुकेश दलाल यांना मिळाला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबतीत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top