महाराष्ट्र राज्यातील राहुरी येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत,सांगली जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट मुलींच्या संघाला तृतीय क्रमांक.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

राहुरी येथे संपन्न झालेल्या ओपन गट मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत,सांगली जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे.राहुरी येथे संपन्न झालेल्या ओपन मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सांगली जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल विजेत्या संघातील खेळाडूंचे व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून,राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे नांव राज्यस्तरावर कोरले गेले आहे.

सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या संघातील खेळाडू खालीलप्रमाणे साक्षी गणे कर्णधार (सांगली),विकेट कीपर रोहिणी सकटे(विटा),ऋतुजा तोरडमल,ऐश्वर्या कर्जवाड,तेजस्विनी काशीद,प्रियांका मातंगी,शबरी संती, श्रुतिका पाटील,पायल निगडी,ज्योती कटरे,दिनाशरोन मिनगोल,स्वीटी गावडे या संपूर्ण झालेल्या सामन्यात व संघनायक साक्षी गणे व कीपर रोहिणी सकटे बॉलर, तेजस्विनी काशीद,ऐश्वर्या कर्जवाड व ऋतुजा तोरडमल  यांच्या उत्कृष्ट कामगिरीमूळे संघाला चालना मिळाली या ओपनगट मुलींच्या सांगली जिल्हा संघाला व खेळाडूंना सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह दादा सावंत,कार्याध्यक्ष - परवेज गडीकर ,उपाध्यक्ष - अझर शेख, संघटनेचे संचालक - महमंदहुसेन शेख,स्वप्नील सुर्वे,यश सावंत यांचे प्रेरणा मिळाले व सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजय बिराजदार सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top