सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लक्षवेधी लढतीची शक्यता;महायुती पुरस्कृत भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील,अपक्ष उमेदवार विशाल पाटील,महाआघाडी पुरस्कृत शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार पै.चंद्रहार पाटील आखाड्यात राहण्याची शक्यता.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून,महायुती पुरस्कृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील,अपक्ष उमेदवार विशाल पाटील,महाआघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पै.चंद्रहार पाटील यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत,काँग्रेस पक्षाने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरुवातीपासूनच जागेसाठी दावा केला होता.अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून,महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल ही केला गेला.काँग्रेस पक्षाने देखील सांगली लोकसभा मतदारसंघाबाबतीत दिल्ली दरबारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे दाद मागून,जागेवर हक्क सांगितला होता. अखेर शेवटी बऱ्याच उलथापालथी नंतर सांगली लोकसभा मतदारसंघ हा,महाआघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे कडे गेला आहे.अजूनही सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भेट यांच्या वाद-संवाद चालू आहे.अखेर सरतेशेवटी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे दि. 22/ 4 /2024 दुपारी 3:00 नंतर सांगली मतदारसंघा बाबतीत चित्र स्पष्ट होईल असे वाटते.

सांगली लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 18,65,960 असून त्यातील पुरुष मतदार 9 लाख 52 हजार 5 अशी आहे व महिला मतदारांची संख्या 9 लाख 13 हजार 743 असून, तृतीयपंथीय मतदार संख्या 112 आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून, वसंतदादा घराण्यातील सर्व व्यक्ती,काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी एकवटल्याचे दिसून येत आहे.दुसरी बाजू म्हणजे सांगलीच्या जागेवरून भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी बाबत रस्सीखेच सुरू असतानाच,पहिल्यांच यादीत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा तिकीट देण्यात आल्यामुळे,त्यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच जोर लावलेला आहे.एकंदरीत उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघ बाबतीत चित्र स्पष्ट होईल असे वाटते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top