महाराष्ट्र राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर; हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असून, हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र राज्यात अहमदनगर,सोलापूर,पुणे,सांगली,सातारा,नाशिक, जळगाव,ठाणे आदी जिल्ह्यांना रेड अलर्ट,त्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर,परभणी,नांदेड,जालना,बीड व विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेच्या लाटे संबंधी इशारा दिला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असून,तापमान जवळपास 40°c च्या वर गेले आहे.सांगली जिल्ह्याचे देखील सध्याचे तापमान हे 40° सेल्सियसच्या आसपास खेळत आहे.महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून बचाव होण्यासाठी, दिवसा उन्हात कामासाठी बाहेर जाणे टाळावे असे आवाहन हवामान तज्ञांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top