केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न;काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या उद्या होणाऱ्या रोडशोची जय्यत तयारी.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व उमेदवार श्री.राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ,वीरशैव लिंगायत समाजाची महाबैठक संपन्न झाली.काँग्रेसचे नेते व वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचाराची होम टू होम प्रचार यंत्रणा राबवण्यावर महाबैठकीत समग्र चर्चा झाली.उद्या होणाऱ्या प्रियंका गांधी यांच्या रोडशो ची जयत तयारी करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसापासून कालपट्टा,वैतेरी,महानंदवाडी,बत्तेरी येथील प्रमुख वीरशैव लिंगायत लोकांचे घरोघरी जाऊन,राहुल गांधी यांना मतदान करण्यासाठी विनंती काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.आमदार बालकृष्णन, आमदार सिद्धक,वायनाड काँग्रेस शहर अध्यक्ष अपचनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजन केले.यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा वायनाड जिल्हा अध्यक्ष संजीवजी कालपेटा,अध्यक्ष राजेंद्रजी यांच्यासह समाज बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दोन दिवसापासून वायनाड लोकसभा मतदारसंघात फिरत असताना,एक अतिशय काँग्रेससाठी जल्लोषमय वातावरण दिसत असून,येथील मतदार बंधू भगिनी व लोकांनी प्रतिज्ञा केल्यासारखे वातावरण दिसत असून,या वेळेस  5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य आम्ही आमचे नेते व वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांना देऊ असे सांगत आहेत. 

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियांका गांधी यां देखील उद्या रोडशो करणार आहेत.त्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यात व कार्यकर्त्यांच्यात एक प्रचाराचा जोश व उत्साह आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top