नवी मुंबई येथे उद्योजिका समाजसेविका पल्लवीताई होळकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश; महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी पल्लवीताई होळकर यांची नियुक्ती.!--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

नवी मुंबई येथे प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पल्लवीताई होळकर यांचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश झाला असून,त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दि.27 एप्रिल 2024 रोजी, शितल हॉल,सेक्टर ७,कामोठे नवी मुंबई येथे झालेल्या समारंभात,उद्योजिका, समाजसेविका,लहू कन्या,मातंग समाजाच्या,पल्लवी ताई होळकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षात प्रवेश केला असून,राष्ट्रीय अध्यक्ष (आरपीआय ) तथा केंद्रीय मंत्री मा.नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने पल्लवीताई होळकर यांचे,महिला आघाडी महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नियुक्तीची घोषणा,महाराष्ट्र राज्याच्या जनरल सेक्रेटरी ॲड.अभयाताई सोनवणे यांनी केली आहे. प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पल्लवीताई होळकर या मातंग समाजाच्या असून त्यांचे सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय व वाखाण्याजोगे आहे.आज पर्यंत प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पल्लवीताई होळकर यांनी राज्यस्तरीय समाजकार्यात हिरादीने भाग घेऊन,आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

सदर प्रसंगी महाराष्ट्र उपाध्यक्षा शशिकलाताई जाधव, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड,माजी मातंग आघाडी कोकण तुषारदादा कांबळे,नवी मुंबई जिल्हा अध्यक्षा शिलाताई बोदडे,मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू, उत्तर मुंबई अध्यक्ष निशाताई मोदी,कामोठे शहर अध्यक्ष ऍड मंगेश धिवार,नवी मुंबई नेते प्रभाकर कांबळे,स्थनिक पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला आदी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top