कोल्हापुरात सिद्धगिरी हॉस्पिटलमधील रुग्णवाहिकेतून येवून केले बहीण -भावाने पहिले मतदान.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

कदमवाडी,कोल्हापूर येथील स्वानंद बाळकृष्ण शिंदे यांना डेंगूची लागण झाल्याने ते व त्यांची बहिण शामल शिंदे गेली तीन दिवस ते सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.यावेळच्या लोकसभेचे मतदान हे पहिलेच असल्यामुळे ह्या मतदानाच्या  पवित्र हक्कापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी रुग्णालय प्रशासन विनंती करून रुग्णवाहिकेतून येवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी बोलताना स्वानंद शिंदे म्हणाले,“माझे हे पहिलेच मतदान आहे.हा लोकशाहीचा उत्सव आहे,आणि यावेळी मी आजारी आहे म्हणून मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहणे योग्य नाही.म्हणूनच मी आज रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आलोय.राष्ट्रहितासाठी आपण मतदान करणे आवश्यक आहे,त्यामुळे मी सर्वाना आवाहान करू इच्छितो कि,तुम्ही हि आजचा दिवस मतदानाची सुट्टी म्हणून राष्ट्राच्या प्रगतीसाठी मतदान केंद्रावर जरुर यावे आणि भारताचा डंका आज जगभरात गाजत आहे तो असाच अबाधित ठेवण्यासाठी पाउल टाकावे.”

त्यांनी लोकशाही बळकटीसाठी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top