कोल्हापूरला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाट व आसपासचा परिसर असंख्य दिव्यांच्या साक्षीने, प्रकाशोत्सवाने उजळला---*

0

 *कोल्हापूरला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाट व आसपासचा परिसर असंख्य दिव्यांच्या साक्षीने, प्रकाशोत्सवाने उजळला---*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 


 कोल्हापुरात पंचगंगा घाट व आसपासचा परिसर आज त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी, लाखोंच्या दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघून, प्रकाशोत्सव साजरा झाला. कोल्हापूरकर शहरवासी नागरिकांचा दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेचा, पंचगंगा घाटावरील दीपोत्सव ,हा नेत्रदीपक ठरत असतो. कोल्हापूरकर नागरिक प्रचंड संख्येने दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने, पंचगंगा घाटावर असंख्य दिव्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सव साजरा करतात आणि येणाऱ्या नवीन वर्षाला, सुखाच्या वाटेवर प्रकाश पडावा अशी प्रार्थना करतात. आज असंख्य पणतीच्या आकर्षक डिझाईनच्या दिव्यांनी, घाट परिसर उजळून निघून, अपूर्ण अवस्थेत असलेल्या नवीन पुलावर देखील लेसर किरणांची केलेली रोषणाई लक्ष वेधून घेत होती. यात प्रामुख्याने कोल्हापुरातील तरुणाई  वर्गांचा संख्या लक्षणीय होती व त्यांचा जोश ओसंडून वाहत होता. जणू काही दिव्यांच्या रोषणाईने, पंचगंगा घाटाचा परिसर व आसपासचा भाग उजळून निघाला होता, कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळपण नव्या पुलावर दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. एकंदरीतच कोल्हापूरकरांचा त्रिपुरा पौर्णिमा साजरा करण्याचा उत्साह यावर्षी मोठ्या प्रमाणात जाणवत होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top