राऊतांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची कोठडी; ईडीने केलेली आठ दिवसांच्या कोठडीची मागणी

0

 


शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे.

विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापेमारी करून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील दहा लाखाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहितीही समोर येत आहे. संबंधित दहा लाख रुपये अयोध्या दौऱ्यातून उरलेले असून ती रक्कम पक्ष कार्यालयात जमा करण्यासाठी ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. राऊत यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे. तसेच राऊतांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. राऊत यांना अटक केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादनंतर ते पुण्यात देखील शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

This news is co-provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top