राऊतांच्या घरी सापडलेल्या पैश्यांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव, मुख्यमंत्री म्हणतात…

0

 


शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. काल मुंबईतील पीएमएलए कोर्टात त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ६० वर्षीय राऊत यांच्यावर ही कारवाई सुरु आहे. यावेळी राऊतांच्या घरी ईडीला मोठी रक्कम सापडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत सुनिल राऊत यांनी खुलासा केला आहे. यावर चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जी काही रक्कम मिळाली, ती शिवसैनिकांच्या अयोध्या भेटीसाठी होती. त्या पैशावर एकनाथ शिंदे अयोध्या यात्रा असेही लिहिले आहे, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली होती.

घरातून 11.50 लाख रुपये जप्त-
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त केले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईत पैश्यांच्या बंडलवर माझं नाव होतं. तर त्याची चौकशी करा. या प्रकरणामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा.”

संजय राऊत यांच्या घराची झडती-
रविवार सुमारे 9 तास ईडीच्या पथकाने संजय राऊत यांच्या घराची झडती घेतली. पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने हा छापा टाकला होता. रविवारी ईडीचे पथक सकाळी ७ वाजता राऊत यांच्या भांडुप येथील घरी पोहोचले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोमवारी त्यांना कोर्टात हजर केले. सध्या ते ई़़डी कोठडीत आहेत.

काय आहे पत्रा चाळ घोटाळा?
हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी 672 सदनिका पूर्वीपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग अन्य बिल्डरांना विकण्यात आला.

This news is co-provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top