सांगलीतील तुंग येथील जागृत श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त, चैत्र शुद्ध नवमी गुरुवार दि. 30/ 3 /2013 पासून धार्मिक सेवा कार्यक्रम चालू होऊन , चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवार दि. 6/ 4 /2023 रोजी, हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार. ----

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी)

सांगलीतील तुंग येथे प्रसिद्ध व जागृत असलेल्या हनुमान मंदिरामध्ये, चैत्र शुद्ध नवमी गुरुवार दि. 30/ 3 /2013 पासून हनुमान जन्मोत्सवानिमित्त, धार्मिक कार्यक्रम सेवा चालू असून, चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवार दि. 6 /4/ 2023 रोजी, श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. श्री हनुमान मंदिरातील दैनंदिनी कार्यक्रमांमध्ये, दररोज पहाटे 5:00 वाजता काकड आरती, श्रींची विधिवत पूजा करून 9:00 वाजता आरती, सकाळी ठीक 7:00 ते 11:00 वाजेपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ठीक 6:00 ते 6:30 चे दरम्यान हरिपाठचे वाचन ,सायंकाळी ठीक 7:00 वाजता आरती, रात्री 9:00 ते 11:00 किर्तन व रात्री 11:00 ते पहाटे 4:00 पर्यंत हरिजागर असे आहेत. व्यासपीठ अधिष्ठान श्री शिवाजी दत्तू वाईंगडे यांचेकडे आहे.
चैत्र शुद्ध नवमीपासून चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत सुरू होणाऱ्या श्रींचे उत्सवास नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ,विविध भजनी मंडळाचे भजने, नामवंत प्रसिद्ध गायकांची गायन सेवा असे विविध सेवामय कार्यक्रम आयोजित केले आहेत. यातील मुख्य म्हणजे चैत्रशुद्ध पौर्णिमा गुरुवार दि. 6/ 4/ 2023 रोजी ,श्री हनुमान जन्मोत्सवाचे किर्तन पहाटे 4:00 ते 6:00 पर्यंत ह. भ. प. भिकोजी शिंदे महाराज कासारवाडी यांचे होणार आहे .श्रींचा जन्मकाळ सोहळा सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी सूर्योदयाच्या वेळी साजरा होणार आहे. श्रींचे मंदिरातील किर्तन कार्यक्रमास, तुंग व परिसरातील सर्व भजनी मंडळी साथ- संगत करणार आहेत. श्रींचा पालखी सोहळा गुरुवार दि. 6 /4/ 2023 रोजी रात्री 12:00 वाजता सुरू होईल,  तसेच येणाऱ्या भक्त भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाची वेळ दुपारी 1:00 वाजता ठेवण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक शनिवारी व पौर्णिमेला दुपारी 12:00 वाजता व सायंकाळी 7:00 वाजता हनुमान देवस्थान ट्रस्ट कडून, अन्नदानाची सोय करण्यात आली आहे. हनुमान मंदिरातील होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनासाठी, दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत तुंग, तुंग मधील सर्व ग्रामस्थ व तुंग मधील सर्व गणेश मंडळे या्ंचे विशेष सहकार्य लाभले आहे.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top