सांगली संस्थानाच्या पारंपारिक शाही मिरवणुकीने विघ्नहर्ता श्री गणरायास भाव भक्तीपूर्वक अंतकरणाने निरोप…

0
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क -
( अनिल जोशी) 

सांगली संस्थांनमध्ये चोर गणपतीच्या आगमनापासून दरबार हॉलमध्ये श्री गणेशोत्सवा सुरुवात झाली होती आणि गणेश चतुर्थीस श्री संस्थानच्या पारंपारिक दरबार हॉलमध्ये ,विघ्नहर्ता श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीमंत राजे विजयसिंह पटवर्धन यांचे हस्ते विधिवत करण्यात आली होती .गेली पाच दिवस संस्थानच्या दरबार हॉलमध्ये भावगीत गायन ,कीर्तन, भजन, हळदीकुंकू ,महापूजा, व्याख्याने आदी पारंपारिक कार्यक्रम चालू होते. काल दुपारी साडेतीन वाजता संस्थानचे श्रीमंत राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांचे हस्ते, श्रींच्या मूर्तीची विधिवत उत्तर पूजा करून ,संस्थांनच्या रथोत्सवास सुरुवात झाली .यंदाचा निर्बंध मुक्त रथोत्सव पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील व कर्नाटकातील असंख्य गणेश भक्त भाविकांनी उपस्थिती लावली होती. लाकडी नयन मनोहर मूर्ती काम असलेल्या रथाला फुले, माळा आदींनी सजवण्यात आले होते. 

संस्थांनच्या रथोत्सवाच्या रस्त्याच्या मार्गावर ,आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. रथोत्सवाच्या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाड्या, घोडेस्वार पथके ,बँड -ढोल -ताशा पथके , शाळांचे लेझीम पथके ,भजनी मंडळे, आसमंतात कडाडणारी हलगी पथके, लाठ्याकाटीची खेळ करणारी पथके, झांज पथके सहभागी झाली असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गणेशभक्त भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. संस्थांनची शाही रथोत्सव मिरवणूक राजवाडा चौक, पटेल चौक ,गणपती चौक, टिळक चौक  या मार्गावरून जल्लोष वातावरणात निघाली होती व शेवटी सरकारी घाटावर विधिपूर्वक श्रींच्या मूर्तीची आरती करून, विधिवत संस्थांनचे पारंपारिक विसर्जनाचा मान असलेले मानकरी गजानन आंबी विश्वेश आंबी राजेंद्र आंबी आदी परिवारांच्या कडून विसर्जन करण्यात आले. 


या सांगली संस्थांनच्या शाही रथोत्सव कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील ,जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील ,जनसुराज्य पक्षाचे नेते सीमित कदम ,माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलीस उपअधीक्षक मनीषा दुबले, पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर ,दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top